Jagdish Patil
इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमधील संघर्ष विकोपाला गेला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हवाई हल्ले सुरू आहेत.
इस्रायलच्या तेल अवीव, जेरुसलेम, हायफा या शहरांमध्ये इराणच्या क्षेपणास्त्रांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केला आहे.
तर इस्रायलची अत्याधुनिक हवाई सुरक्षा प्रणाली (आयर्न डोम) भेदण्यासाठी नवे तंत्र वापरल्याचा दावा इराणने केला. त्यामुळे आयर्न डोम प्रणालीत काही त्रुटी असल्याची चर्चा रंगली आहे.
इस्रायलने इराणमधील अणुऊर्जा आस्थापनासह वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य केलं. त्याचा बदला म्हणून इराणने इस्रायलमधील प्रमुख शहरांवर हल्ला केला.
या हल्ल्यानंतर चर्चेत आलेली इस्रायलची जगभरात चर्चेत असलेली आयर्न डोम सिस्टम नेमकी काय आहे ते जाणून घेऊया.
आयर्न डोम सिस्टम कोणत्याही क्षेपणास्त्राच्या हल्ल्यापासून संपूर्ण शहर वाचवू शकते. यामध्ये रॉकेट्स आणि क्षेपणास्त्र हवेत सोडले जाऊ शकतात.
2006 मध्ये जेव्हा इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात युद्ध चालू होते आणि दहशतवादी हिज्बुल्ला संघटनेने हल्ला केल्यानंतर इस्रायलने या सिस्टमचा शोध लावला.
या प्रणालीमध्ये 3 ते 4 गोष्टी एकत्र काम करतात. त्यामध्ये असलेले शक्तिशाली रडार वेळेत आकाशातील सर्वात लहान वस्तू पाहून अलर्ट जारी करते.
हा इशारा वरिष्ठ अधिकारी बसलेल्या युद्ध व्यवस्थापन प्रणालीशी जोडलेला असतो. ही पूर्णपणे स्वयंचलित यंत्रणा असून यातील क्षेपणास्त्र बॅटरीशी जोडलेली असतात.
ही क्षेपणास्त्र अलर्ट मेसेज मिळताच जो हवेतच धोका ट्रॅक करून हवेतच खाली पाडते. इस्रायलने आपल्या महत्वाच्या शहरात या सिस्टमचे जाळे पसरले आहे.
मात्र, या यंत्रणेतील बॅटरीमध्ये 4 क्षेपणास्त्रे आहेत, ज्याची किंमत सात कोटींहून जास्त आहे. प्रत्येक क्षेपणास्त्राची किंमत 59 लाख रुपये आहे. त्यामुळे ही प्रणाली अचूक असली तरी खूप महागडी देखील आहे.