इराण-इस्त्राईलमधील युध्दाचे धडकी भरवणारे ‘हे’ फोटो होतायेत व्हायरल...

Rajanand More

इराण-इस्त्राईल संघर्ष

इराण आणि इस्त्राईलमधील संघर्षाचे रुपांतर आता युध्दात झाले आहे. इस्त्राईलने १३ जूनला इराणवर पहिला हल्ला करत सैन्यतळ व अण्वस्त्र असलेल्या ठिकाणांना लक्ष्य केले होते.

Iran Israel War | Sarkarnama

ऑपरेशन रायझिंग लायन

इस्त्राईलने या ऑपरेशनला ‘रायझिंग लायन’ असे नाव दिले आहे. इराणमधील तेहरानसह अनेक प्रमुख शहरांवर हल्ला चढविण्यात आला आहे.

Iran Israel War | Sarkarnama

ट्रू प्रॉमिस ३

इराणनेही प्रतिहल्ला करत इस्त्राईल सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. या ऑपरेशनला ‘ट्रू प्रॉमिस ३’ हे नाव देण्यात आले आहे.

Iran Israel War | Sarkarnama

मिसाईल्सचा पाऊस

इस्त्राईलकडून इराणवर जणू मिसाईल्सचा पाऊस पाडला जात आहे. त्यामुळे इराणमधील अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. शेकडो नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावाही केला जात आहे.

Iran Israel War | Sarkarnama

इमारती उद्धस्त

इराणसह इस्त्राईलमधील तेल अवीव शहरातील अनेक इमारती उद्धस्त झाल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. मोठ्या इमारतींचे रुपांतर ढिगाऱ्यांमध्ये झाले आहे.

Iran Israel War | Sarkarnama

तेहरानला लक्ष्य

इस्त्राईलकडून तेहरान शहरावर जोरदार हल्ला चढविला जात असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही नागरिकांना तेहरान सोडण्यास सांगितले आहे.

Iran Israel War | Sarkarnama

रस्त्यांवर वाहनांच्या रांगा

ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर तेहरान सोडून जाण्यासाठी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.  

Iran Israel War | Sarkarnama

10 हजार भारतीय

इराणध्ये जवळपास 10 हजार भारतीय नागरिक अडकले आहेत. तेहरानमधील नागरिकांना भारतीय राजदुताने बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे तेहरानवर आणखी जोरदार हल्ले होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Iran Israel War | Sarkarnama

NEXT : गँगस्टर अरूण गवळीची लेक ठाकरेंना धक्का देणार

येथे क्लिक करा.