Pradeep Pendhare
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीने 100 डॉलर प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला आहे.
भारतात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्याचे मोठे आव्हान सरकारी तेल कंपन्यांसमोर आहे.
'इंडियन ऑईल', 'बीपीसीएल' आणि 'एचपीसीएल' कंपन्यांनी रिफायनरीच्या देयकात मोठ्या कपातीचा निर्णय घेतला आहे.
ओएमसी कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल, एटीएफ आणि केरोसीनसाठीच्या रिफायनरी ट्रान्सफर प्राईसमध्ये मोठी घट केली.
काही विशिष्ट प्रकरणांमध्ये ही कपात प्रति लीटर 60 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
भारतात भाववाढ रोखल्यामुळे तेल कंपन्यांना होणारा तोटा मोठा असून, पेट्रोलमागे प्रति लीटर 24 रुपये, डिझेलमागे प्रति लीटर 100 रुपये तोटा होत आहे.
MRPL, CPCL आणि HMEL यांसारख्या कंपन्या, ज्या आपले बहुतांश उत्पादन सरकारी तेल कंपन्यांना विकतात, त्यांच्या नफ्यावर मोठा परिणाम झाला आहे.
IOC, BPCL आणि HPCL यांसारख्या कंपन्यांचे स्वतःचे रिफायनिंग आणि मार्केटिंग युनिट्स आहेत. त्यामुळे त्यांचा तोटा कमी आहे.