Pradeep Pendhare
इराण आणि इस्त्रायल-अमेरिकामधील युद्ध शिगेला पोहोचलं असून, आखाती देशात तणाव कायम आहे.
इराणने अमेरिकेला युद्धात आक्रमक उत्तर देताना, हार्मुझ सामुद्रधुनीत अमेरिकन विमान पाडल्याचा दावा केला आहे.
युद्ध पेटलेलं असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाच्या आर्थिक धोरणात मोठा बदल केला आहे.
अमेरिकेच्या संरक्षण खर्चामध्ये तब्बल 500 अब्ज डॉलर्सची वाढ जाहीर केली आहे.
संरक्षण खर्चात वाढ जाहीर करत असताना, डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर खर्चांमध्ये 10 टक्के कपात केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ट्रिलियन डॉलर्सचा संरक्षण खर्च वाढवून तो दीड ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याची योजना आखली आहे.
तसंच लष्करी जवानांच्या वेतनामध्ये 5 ते 7 टक्क्यांची वाढ करण्याचीही तरतूद केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या संरक्षण वाढीच्या या प्रस्तावाला काँग्रेसची मंजुरी आवश्यक असणार आहे.
अमेरिकेचा हा संरक्षण खर्च गेल्या वर्षी पेक्षा 40 ते 44 टक्के अधिक आहे.