Aslam Shanedivan
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर उमटताना दिसत आहेत.
अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे निधन झाले. ज्यानंतर आता जगभरात तणाव निर्माण झालाय.
यानंतर देशातील उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातही तणाव निर्माण झाला असून जिल्ह्यातील सिरौली गौसपुर तहसिलच्या 'किंतूर' गावात शोककळा पसरली आहे.
याचे मुळ कारण अयातुल्ला खामेनेई यांच्या पूर्वजांचे या गावाशी नाते होते. त्यांचे आजोबा सय्यद अहमद मुसावी हे १८-१९ व्या शतकात याच किंतूर गावात वास्तव्यास होते.
यामुळेच त्यांच्या कुटुंबाने आपल्या नावापुढे 'हिंदी' हे उपनाम जोडले असावे असे गावातील वडीलधारी मंडळी आणि स्थानिक लोक मानतात
आजही या गावात खामेनेई यांच्या कुटुंबाशी संबंधित जुनी कागदपत्रे आणि त्यांचे जुने घर अस्तित्वात आहे, जे या ऐतिहासिक संबंधांची साक्ष देतात.
गावातील डॉ. रेहान काजमी यांनी शोक व्यक्त करताना, खामेनेई यांनी जगाला नेहमीच मानवता, भाईचारा आणि शांततेचा संदेश दिला होता असे म्हणतात