Ganesh Sonawane
इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड्सनी होर्मुझची सामुद्रधुनी (स्ट्रेट ऑफ होर्मुझ) जहाजांसाठी पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली आहे.
स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजाला आग लावली जाईल असा इशारा इराणने दिला आहे.
हा पर्शियन आखातातील एक अरुंद असा जहाजांना जाण्यासाठीचा जलमार्ग मार्ग आहे.
जगातील दैनंदिन तेलाच्या वापराच्या सुमारे २० टक्के तेल हे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाते. या खाडीची किमान रुंदी अंदाजे ३३ किलोमीटर आहे.
पण जहाजांसाठीची मार्गिका अवघी तीन किलोमीटर रुंद आहे. दररोज सरासरी दोन कोटी बॅरलहून अधिक तेल जहाद्वांरे वाहून नेलं जातं.
सौदी अरेबिया, कुवेत, इराक, कतार, बहरीन, युएई आणि स्वतः इराणमधील तेल आणि वायू जहाजे याच मार्गाने जातात.
त्यामुळे हा मार्ग बंद झाल्यास जागतिक स्तरावर उर्जेचा तुडवडा निर्माण होऊन मोठी आर्थिक मंदीची शक्यता आहे.
भारताला मिळणारं बहुतांश तेल आणि नैसर्गिक वायू याच मार्गाने येतो. हा मार्ग बंद झाल्यास भारतात पेट्रोल-डिजेलचे दर वाढतील. पुरवठा विस्कळीत होईल.