इराण-इस्राइलमधील युद्ध मध्यपूर्वेत अन् गॅसची टंचाई भारतात कशी? जाणून घ्या

Jagdish Patil

पुरवठा

इराण-इस्रायल युद्धामुळे भारतात होणारा खनिज तेल, नैसर्गिक वायू पुरवठा खंडित झाला आहे.

LPG Gas Production Process | Sarkarnama

टंचाई

त्यामुळे भारतात गॅस टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून गॅससाठी लोकांना रांगेत उभं राहावं लागत आहे.

LPG Gas Production Process | Sarkarnama

गॅस

याच पार्श्वभूमीवर आपल्या घरातील सिलिंडरमधील गॅस नेमका कसा तयार होतो ते जाणून घेऊया.

LPG Gas Production Process | Sarkarnama

प्रोपेन आणि ब्युटेन

LPG हा थेट जमिनीतून मिळत नाही तर तो प्रोपेन आणि ब्युटेन या 2 वायूंपासून तयार केला जातो.

LPG Gas Production Process | Sarkarnama

प्रक्रिया

जमिनीतून काढलेल्या प्रोपेन आणि ब्युटेन युक्त नैसर्गिक वायूवर रिफायनरीमध्ये प्रक्रिया केली जाते.

LPG Gas Production Process | Sarkarnama

वायू

या प्रक्रियेत सर्वात वरच्या थरात LPG मिळतो. नैसर्गिक अवस्थेत हे घटक वायू स्वरूपात असतात.

LPG Gas Production Process | Sarkarnama

रूपांतर

त्यांच्यावर उच्च दाब देऊन त्यांचे रूपांतर द्रवात म्हणजेच 'लिक्विफाइड' पेट्रोलियम गॅस मध्ये केले जाते.

LPG Gas Production Process | Sarkarnama

शुद्धीकरण

गॅसमधून पाणी आणि सल्फरसारखे इतर अशुद्ध घटक शुद्धीकरण प्रक्रियेत काढण्यात येतात.

LPG Gas Production Process | Sarkarnama

इथिल मरकॅप्टन

एलपीजीला वास नसतो. त्यामुळे गॅस गळती लक्षात येण्यासाठी त्यात 'इथिल मरकॅप्टन' नावाचा उग्र वासाचा पदार्थ मिसळतात.

LPG Gas Production Process | Sarkarnama

LPG

या सर्व प्रक्रियेनंतर तयार झालेला हा द्रव वायू अर्थात LPG वेगवेगळ्या सिलिंडरमध्ये साठवला जातो.

LPG Gas Production Process | Sarkarnama

NEXT : जम्मू-काश्मिरच्या माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार करणाऱ्या कमल सिंग जामवालची हिस्ट्री काय?

Kamal Singh Jamwal Arrested | Sarkarnama
क्लिक करा