Jagdish Patil
इराण आणि इस्त्रायल या दोन देशांमधील संघर्ष शिगेला पोहचला असून दोन्ही देशांकडून एकमेकांवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरु आहेत.
इस्त्रायलने इराणमधील तेहरानला टार्गेट केल्यानंतर इराणनेही इस्त्रायला प्रत्युत्तर देत हवाई हल्ले सुरू केलेत.
इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणच्या प्रमुख लष्करी कमांडर ठार झाल्यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.
अशातच आता इराणने आपल्या नागरिकांना What’s App डिलिट करण्याचे आदेश दिले आहेत.
Whats App वरील माहितीचा उपयोग इस्त्रायलला पाठवण्यासाठी केला जाऊ शकतो, असा दावा करत त्यांनी हा आदेश दिला आहे.
मात्र, याबाबत इराणने Whats App कडे कोणतीही विचारणा केली नसल्याचं मेटा कंपनीने स्पष्ट केलं.
मेटाने एंड-टू-एंड एन्क्रिप्शन फिचर यासाठीच तयार केलं आहे की, दोन व्यक्तींमधील संवाद गुप्त रहावा तो तिसऱ्या व्यक्तीला समजू नये, असं स्पष्टीकरण व्हॉट्स अॅपने दिलं आहे.
तर इराणनेने Whats App बाबत केलेल सर्व दावे मेटाने फेटाळत आम्ही कोणत्याही सरकारला माहिती प्रदान करत नसल्याचंही म्हटलं आहे.