Ebrahim Raisi : इब्राहिम रईसी यांचा अपघात की घात? इराणच्या कट्टरपंथी राष्ट्रपतींंचा दुर्दैवी अंत...

Rajanand More

इब्राहिम रईसी

इराणमध्ये हेलिकॉप्टर अपघातात राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी त्यांचे हेलिकॉप्टर बेपत्ता झाले होते.

Ebrahim Raisi | Sarrkarnama

घात की अपघात?

रईसी यांचे हेलिकॉप्टर इराणधील उत्तर पश्चिमी प्रांतातील पूर्व अजरबैजानमधील डोंगराळ भागात दुर्घटनाग्रस्त झाले. हा घात की अपघात, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

Helicopter Crash | Sarkarnama

परराष्ट्र मंत्र्यांचाही मृत्यू

परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियन, पूर्व अजरबैजाना प्रांताचे गव्हर्नर मालेक रहमती, धार्मिक नेता मोहम्मद अली आले-हाशेम हेही हेलिकॉप्टरमध्ये होते. त्यांचाही मृतांमध्ये समावेश.

Ebrahim Raisi | Sarkarnama

तीन वर्षांपासून पदावर

रईसी यांची 2021 मध्ये राष्ट्रपतीपती निवड झाली होती. त्यांनी जगातील शक्तीशाली देशांमध्ये इराणला अत्याधुनिक अण्वस्त्रांनी सज्ज करण्यासाठी खूप प्रयत्न केले.

Ebrahim Raisi | Sarkarnama

1960 मध्ये जन्म

इराणमधील मशहद या पवित्र शहरात 1960 मध्ये जन्म. शिया संस्थेत 15 व्या वर्षी दाखल. कट्टरपंथी म्हणून ओळख.

Ebrahim Raisi | sarkarnama

राजकारणाकडे कल

रईसी यांचे वडील मौलवी होते. रईसी यांचा सुरुवातीपासूनच धर्म आणि राजकारणाकडे कल होता. शिक्षण घेत असतानाच राजकारणात सक्रीय.

Ebrahim Raisi | sarkarnama

सरकारी वकील

वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्यांना तेहरानमधील कराजचे, 1989 पासून ते 1994 पर्यंत तेहरानचे तर 2014 मध्ये ते इराणचे महाभियोजक. इराणी न्यायपालिकेचेही ते प्रमुख होते.

Ebrahim Raisi | sarkarnama

खुमैनी यांचे विश्वासू

सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्लाह अली खुमैनी यांचे विश्वासू म्हणून ओळख. 2021 मध्ये उदारवादी हसन रुहानी यांच्या जागी राष्ट्रपतीपदी निवड.

Ebrahim Raisi | Sarkarnama

मोदींकडून शोक व्यक्त

रईसींच्या निधनामुळे धक्का बसला. भारत-इराण द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी त्यांचे योगदान आठवणीत राहील, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून व्यक्त.

Ebrahim Raisi, PM Narendra Modi | Sarkarnama

NEXT : लोकशाहीचा उत्सव ! आज चित्रपटसृष्टीतील मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क