Ganesh Sonawane
इराण आणि अमेरिकेदरम्यान युद्धसमाप्तीचा प्राथमिक करार झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.
त्यानुसार होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याचे उभय देशांकडून मान्य करण्यात आले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर युद्ध समाप्तीसंदर्भातील कराराची घोषणा केली. या करारावर अंतिम स्वाक्षरी स्वित्झर्लंडमध्ये होणार आहे.
भारत युरिया, डीएपी आणि इतर रासायनिक खतांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे.
पश्चिम आशियातील नैसर्गिक वायू आणि द्रवीभूत नैसर्गिक वायू (एलएनजी) यांचा पुरवठा सुरळीत झाल्यास खत उत्पादनाचा खर्च कमी होऊ शकतो. परिणामी खतांच्या उपलब्धतेवरचा दबावदेखील कमी होण्याची शक्यता आहे.
कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यास डिझेल दर स्थिर राहण्यास मदत होईल. त्यामुळे सिंचन पंप, ट्रॅक्टर, कापणी यंत्रे आणि कृषी माल वाहतूक यांचा खर्च कमी राहू शकतो.
पश्चिम आशिया ही भारतासाठी तांदूळ, साखर, फळे, भाजीपाला आणि मसाले यांची महत्त्वाची बाजारपेठ आहे.
सागरी वाहतूक सुरळीत झाल्यास निर्यात खर्च कमी होऊन भारतीय मालाची इतर देशांच्या मालासोबतची स्पर्धात्मकता वाढू शकते.