सरकारनामा ब्यूरो
उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) नवीन ऑफर आणली आहे.
IRCTC च्या पॅकेजमधून पर्यटकांना काश्मीर, लडाख, हिमाचल, गंगटोक, दार्जिलिंग अशा नैसर्गिक सुंदर ठिकाणांचा आनंद घेता येणार आहे.
धार्मिक यात्रेला जाणाऱ्या पर्यटकांसाठी चार धाम यात्रेच्या पॅकेजची खास ऑफर देण्यात येणार आहे.
या पॅकेजमध्ये मुंबईसह विविध पर्यटन स्थळांचा विमान,रेल्वे, बसप्रवास आणि पर्यटकांची जेवण, हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, टूर गाईड तसेच प्रवास विमा यांचा समावेश असणार आहे.
पश्चिम विभागाचे ग्रुप जनरल मॅनेजर गौरव झा यांनी सांगितले, या पॅकेजचा आनंद पर्यटक त्यांच्या कुटुंबासह किंवा एकट्यानेही ट्रिप बुक करून घेऊ शकता.
यामध्ये 20 एप्रिल, 3 मे, 7 मे, 18 मे, 25 मे, 1 जून या तारखेपर्यत काश्मीर, लडाखसाठी 5 मे, 10 मे, 18 मे, 24 मे पर्यंत, गंगटोक-दार्जिलिंगसाठी 19 एप्रिल, 3 मे, 18 मे पर्यंत, आणि हिमाचलसाठी 28 एप्रिल, 19 मे पर्यंत अशा तारखा असणार आहेत.
चारधाम यात्रेसाठी 24 मे 2025 पर्यंत बुकिंग करू शकणार असून मुंबईहून चारधाम यात्रेसाठी येणाऱ्या पर्यटकांना 61 हजार रुपयांचे पॅकेज ठेवण्यात आले आहे.
आयआरसीटीसीच्या या खास उन्हाळी सहलीच्या पॅकेजचे बुकिंग सुरू झाले आहे. माहितीसाठी आणि तिकिटे बुक करण्यासाठी, तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइट (www.irctctourism.com) ला भेट देऊ शकता.