सरकारनामा ब्यूरो
मुळचे लखनऊचे कुलदीप द्विवेदी हे अलाहाबाद विद्यापीठातून शिक्षण घेत होते.
कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि कुलदीप यांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी त्यांचे वडील सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत असत.
उदरनिर्वाह करण्यासाठी गार्डची नोकरी पुरेशी नव्हती म्हणून नोकरीनंतर त्यांनी शेतीही सुरू केली.
नागरी सेवा परीक्षेत त्यांनी 242 वी रँक मिळवली आणि आयआरएस अधिकारी झाले.
इथेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग त्यांच्यासाठी अत्यंत अडचणींनी भरलेला होता.
अलाहाबाद विद्यापीठातून ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.
कुलदीप यांच्या मते, यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना अभ्यासक्रम समजून घेणे आवश्यक आहे.
कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही त्याचे कुटुंबीय अभ्यासासाठी पुरसे पैसे पुरवत होते.
परिस्थितीवर मात करत त्यांनी यश मिळवले आणि संपूर्ण कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले.