IRS Purvi Nanda : 'यूपीएससी'नंतर सोशल मीडियावर कमबॅक केला 'या' महिला अधिकाऱ्याने

सरकारनामा ब्यूरो

IRS पूर्वी नंदा

राजस्थान येथील उदयपूर जिल्ह्यातील IRS पूर्वी नंदा या 2020 बॅचच्या अधिकारी आहेत.

शिक्षण

पूर्वी यांनी उदयपूर येथील सेंट मेरी शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.

'एलएलबी' पदवीधर

नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमधून त्यांनी एलएलबीची पदवी प्राप्त केली.

कायद्यातून 'यूपीएससी'चा निर्णय

कायद्याचे शिक्षण घेतल्यावर त्यांनी 'यूपीएससी' परीक्षा द्यायचा निर्णय घेतला.

IAS ऐवजी IRS झाल्याचे समाधान

वडिलांचे IAS अधिकारी व्हायचे स्वप्नं होते. मात्र, 'यूपीएससी'त 224 वी 'रँक' मिळवत त्या IRS झाल्या.

स्वयंअध्ययनाने परीक्षा उत्तीर्ण

पूर्वी यांनी कोणताही कोचिंग क्लास न लावता घरीच स्वयंअध्ययनाने 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण केली.

रोज 10 ते 12 तास अभ्यास

मोबाईलचा क्वचित वापर आणि सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहून रोज 10 ते 12 तास अभ्यास केला.

स्वरचित पुस्तक प्रकाशित

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी 'बिहाइंड द सीन : द अनटोल्ड स्टोरीज ऑफ यूपीएससी एस्पिरेंट्स' या नावाने त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

अधिकारी होऊन 'सोशल मीडिया'वर 'कमबॅक

अधिकारी झाल्यानंतर पूर्वी यांनी पुन्हा 'सोशल मीडिया'वर 'कमबॅक' केला आणि आता त्यांचे हजारो 'फॅन फॉलोअर्स' आहेत.

Next : राजस्थानचा बुलंद आवाज अन् भाजपच्या संस्थापकांपैकी एक; घनश्याम तिवारी

येथे क्लिक करा