सरकारनामा ब्यूरो
राजस्थानचा 'बुलंद' आवाज आणि भाजपच्या संस्थापकांपैकी एक असलेले घनश्याम तिवारी यांचा आज वाढदिवस आहे
राजस्थान विधानसभेच्या सीकर मतदारसंघातून ते सलग दोन वेळा निवडून आलेले आहेत.
तिवारी हे राजस्थानातील लोकप्रिय नेते असल्यामुळे जनतेचा त्यांना सदैव पाठिंबा मिळतो.
महाविद्यालयीन जीवनात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते आणि पदाधिकारी राहिले.
सीकरच्या श्री कल्याण संस्कृत महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले आणि जयपूरमधून 'एलएल.बी' करुन कायद्याची पदवी संपादन केली.
भाजपची स्थापना करणाऱ्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी तिवारी हे एक महत्त्वाचे नेते आहेत.
अनेक वर्षे राजस्थानचे नेतृत्व करणारे घनश्याम तिवारी यांना 'भाया' नावाने ओळखले जातात.
केंद्र सरकारविरुद्धच्या लढ्यात तिवारींना तुरुंगात टाकले, तेव्हा अनेक नेत्यांनी त्यांच्या बचावासाठी आवाज उठवत सरकारविरुद्ध आंदोलन केले.
यावेळी अनेक दिग्गज नेत्यांकडून त्यांना पाठिंबा मिळाला, हा त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला.