Pradeep Pendhare
समीर वानखेडे 2008 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेतील (IRS) अधिकारी आहेत.
समीर वानखेडे यांचे कुटुंब मूळचं महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातलं असून, रिसोड तालुक्यातील भरुणतोफा हे त्यांचे मूळ गाव आहे.
भारतीय महसूल सेवेत येण्यापूर्वी ते 2006 साली ते पहिल्यांदा केंद्र सरकारच्या सेंट्रल पोलिस ऑर्गनायझेशनमध्ये (Central Police Organization) होते.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहायक आयुक्त (Assistant Commissioner Customs) म्हणून समीर वानखेडे यांनी काही वर्षं काम केलं.
महसूल गुप्तचर संचलनालय (DRI) आणि दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणांचा तपास करणाऱ्या नॅशनल इनव्हेस्टिगेटिंग एजन्सीतही (NIA) काम केले.
ऑगस्ट 2020 मध्ये समीर वानखेडे यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाचे संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला. यावर्षी त्यांना केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे उत्कृष्ठ तपासासाठीचा पुरस्कार मिळाला.
अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खानला ड्रग्जप्रकरणात अटक करून खळबळ उडवून दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर जाती-धर्माशी निगडीत केलेले आरोप देखील चर्चेत होते.
समीर वानखेडे महायुतीकडून विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत चाचपणी करत असून, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून राजकीय वाटचाल सुरू करत आहेत.