Ganesh Sonawane
सध्या स्वयंघोषित ज्योतिष अशोक खरात हा महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणात कोठडीत आहे.
अशोक खरातमुळे संपूर्ण ज्योतिष क्षेत्र नाहक बदनाम होत असल्याच्या प्रतिक्रिया ज्योतिष क्षेत्रातील जाणकार व्यक्त करताना दिसत आहेत.
महाराष्ट्रातील जादूटोणा प्रतिबंधक कायद्यात 'ज्योतिष' या प्रकारावर थेट बंदी घालण्यात आलेली नाही.
मात्र, खरातसारख्या लोकांनी ज्योतिषशास्राच्या नावाने धंदा मांडल्याच्या प्रतिक्रिया या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
पत्रिका पाहणे, भविष्य सांगणे वा ग्रह-नक्षत्रांवर आधारित सल्ला देणे हा गुन्हा नाही. कारण ते वैयक्तिक श्रद्धा आणि विश्वासाच्या कक्षेत येते.
मात्र, ज्योतिषाच्या नावाखाली फसवणूक करणे, भीती निर्माण करून पैसे उकळणे किंवा अलौकिक शक्तींचा दावा करणे, अशा प्रकारची कृत्ये हा गुन्हा ठरतो.
उदाहरणार्थ 'मी तुमचे सर्व ग्रहदोष दूर करतो' 'हा विधी केला नाही तर अनर्थ होईल' अशी भिती दाखवून खूप सारे पैसे उकळणे किंवा काही अघोरी उपाय करण्यास भाग पाडणे, हे कायद्याच्या चौकटीत गुन्हा ठरू शकते.
अशावेळी संबंधित व्यक्तीवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासोबतच भारतीय दंड संहितेतील फसवणूक किंवा धमकीसंबंधी कलमेही लागू होऊ शकतात.
नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरातवर लैगिंक अत्याचार आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानव्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.