Rashmi Mane
दिल्लीत काल लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच विमा संरक्षणाबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
आतंकवादी हल्ल्यात मृत्यू झाल्यास जीवन विमा पॉलिसी पैसे देईल का?, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. चला, हे नेमकं कसं काम करतं ते जाणून घेऊया.
दहशतवादी घटना क्वचितच घडतात, पण त्यामुळे होणारे नुकसान खूप मोठे असते. केवळ मालमत्तेचेच नव्हे, तर मानवी जीवनावरही मोठा धोका निर्माण होऊ शकतो. वाहनांच्या विम्यात (Car Insurance) अशा आपत्तींचा समावेश असतो आणि दहशतवादी हल्ल्यात नुकसान झाल्यास भरपाई सहज मिळते. मात्र,..
पण जीवन विमा पॉलिसीचं नियम वेगळं असतं. प्रत्येक जीवन विमा पॉलिसीमध्ये दहशतवादी हल्ल्यांचा समावेश आपोआप होत नसतो. काही पॉलिसींमध्ये त्यासाठी स्वतंत्र "अॅड-ऑन कव्हर" घ्यावं लागतं किंवा वेगळी पॉलिसी विकत घ्यावी लागते.
2001 मध्ये अमेरिकेत झालेल्या 9/11 दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातील विमा कंपन्यांनी अशा जोखमींपासून माघार घेतली होती. त्यानंतर भारतात एप्रिल 2002 मध्ये "इंडियन मार्केट टेररिझम रिस्क इन्शुरन्स पूल" (IMTRIP) स्थापन करण्यात आला.
ज्याचे व्यवस्थापन जीआयसी री (GIC Re) करते. देशातील सर्व विमा कंपन्या मिळून या पूलमध्ये प्रीमियम जमा करतात आणि दहशतवादी घटनांमुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी निधी तयार ठेवतात.
हा नियम मालमत्ता विमा पॉलिसींना दहशतवादी धोक्यांपासून सुरक्षा पुरवतो. या पूल अंतर्गत, देशातील सर्व विमा कंपन्या दहशतवादी घटना आणि धोक्यांपासून सामूहिकपणे संरक्षण (Collectively Cooperate) देतात.
जीवन विमामध्ये बहुतांश प्रकरणांमध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्यास विम्याची रक्कम नॉमिनीला दिली जाते. मात्र, जर बीमाधारक स्वतः दंगल किंवा हल्ल्यात सहभागी असेल, किंवा युद्धासारख्या परिस्थितीमुळे मृत्यू झाला असेल, तर कव्हर नाकारलं जातं
म्हणूनच प्रत्येकाने आपल्या पॉलिसीचे नियम नीट वाचून "टेरर कव्हर" आहे का ते तपासावं. कारण अपघात आणि आजारांप्रमाणेच, अनपेक्षित दहशतवादी घटनांमध्येही विमा संरक्षण असणं आजच्या काळात तितकंच आवश्यक आहे.