Jagdish Patil
इस्रायलमधील निवडणुकांमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सर्वात मोठा गट ठरली आहे.
प्राथमिक निकालांनुसार, नेतन्याहू यांच्या आघाडीला 53, विरोधी पक्षनेते गादी आइजनकोट यांच्या आघाडीला 48, तर अरब पक्षांना 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
इस्रायलच्या संसदेत एकूण 120 जागा असून सरकार स्थापन करण्यासाठी 61 खासदारांचे समर्थन आवश्यक आहे.
मात्र, कोणत्याही आघाडीकडे स्वबळाचे बहुमत नसल्याने सरकार स्थापनेसाठी इतर पक्षांचा पाठिंबा मिळवणे आवश्यक आहे.
इस्रायलमध्ये निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यमान पंतप्रधानांना तातडीने पद सोडावे लागत नाही.
नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत विद्यमान पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ कामकाज सुरू ठेवतात.
निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजकीय नेत्यांशी चर्चा केनंतर बहुमत मिळवण्याची शक्यता असलेल्या खासदाराला सरकार स्थापनेची संधी देतात.
सरकार स्थापनेसाठी संबंधित उमेदवाराला सुरुवातीला 28 दिवसांचा वेळ दिला जातो. गरज पडल्यास आणकी 14 दिवसांची मुदतवाढ मिळते.
पहिल्या उमेदवाराला अपयश आल्यास राष्ट्रपती दुसऱ्या नेत्याला संधी देतात. तरीही बहुमतचा आकडा न गाठल्यास पुन्हा निवडणुका घेण्याची वेळ येते.
तोपर्यंत नवीन सरकारचा शपथविधीपर्यंत नेतन्याहू सरकार काळजीवाहू सरकार म्हणून काम करू शकतं.