Jagdish Patil
अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्ध दिवसेंदिवस तीव्र होत आहे.
या युद्धाचे परिणाम इंधन, आणि गॅस दरवाढीच्या निमित्ताने संपूर्ण जगावर होताना दिसत आहे.
अशातच शनिवारी पहाटे इस्त्रायलने इराणच्या तेहरानमधील विमानतळावर मोठा हवाई हल्ला केला.
त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्त्रायलचे प्रमुख शहर असलेल्या तेल अवीववर क्षेपणास्त्रं डागली.
त्यानंतर, इस्त्रायलने इराणच्या इंधन साठवणूक केंद्रांवर हल्ले केल्याची माहिती इस्त्रायलच्या IDF ने ट्विटद्वारे दिली आहे.
IDF ने म्हटलं की, तेहरानमधील IRGC च्या मालकीची अनेक इंधन साठवणूक केंद्र नष्ट करण्यात आली आहेत.
IDF च्या गुप्तचर यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली ‘आयएएफ’ने इंधन साठवणूक केंद्रांवर हल्ले केले.
याच केंद्रावरून इराण आपल्या लष्करासाठी आवश्यक इंधन साठवून त्याचे वितरण करत होता.
या हल्ल्यांमुळे इराणच्या लष्करी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा आयडीएफने केला आहे.
दरम्यान, अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला करण्याचा इशारा देताच इराणनेही आम्ही 6 महिने युद्ध लढू शकतो, असं प्रत्युत्तर अमेरिकेला दिलं आहे.