सरकारनामा ब्यूरो
डॉ. व्ही. नारायणन यांची इस्रोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर ते 14 जानेवारी पासून अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहे. तर जाणून घेऊयात कोण आहेत ते...
तमिळनाडूतील मेलापट्टू या गावातील डॉ. व्ही. नारायणन यांनी आयआयटी खरगपूर येथून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये एम. टेक केलं आणि पीएच.डी. ही मिळवली आहे.
1984 पासून त्यांनी इस्त्रोमध्ये काम करायला सुरुवात केली.
डॉ. व्ही. नारायणन हे लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटरमध्ये (LPSC) संचालक पदावर कार्यरत आहेत.
त्यांनी धृवीय उपग्रह प्रक्षेपक वाहन (PSLV) आणि भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान (GSLV) च्या प्रक्षेपणासाठी 183 लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम्स आणि कंट्रोल पॉवर प्लांट्स विकसित केले आहेत.
भारतीय अंतराळ मोहिमांच्या प्रोजेक्टसाठी त्यांनी भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-3 (GSLV Mk III) प्रक्षेपकाच्या C25 क्रायोजेनिकचे यशस्वीरित्या नेतृत्व केले आहे.
चांद्रयान-2, चांद्रयान-3, आदित्य एल-1 यांसारख्या ऐतिहासिक प्रकल्पांमध्ये डॉ. नारायणन यांनी महत्त्वाची कामगिरी केली आहे.
इस्रोच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर ते लक्ष मानव अंतराळ मोहिम (गगनयान), चांद्रयान-4, मंगळयान-2, शुक्र मोहिम यांच्या प्रक्षेपणाच्या विकासावर काम करणार आहेत.