सरकारनामा ब्यूरो
13 जानेवारी 2025 पासून उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू होणारा कुंभमेळा 45 दिवसांचा असणार आहे.
कुंभमेळाव्याची तयारी सुरू असताना यावर HMPV व्हायरसची सावट असल्याने UPसरकारने लाखो भाविकांच्या सुरक्षतेसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत.
व्हेंटिलेटर,आयसीयू आणि ऑक्सिजनची सुविधा असलेली 'वॉटर ॲम्ब्युलन्स' पहिल्यांदांच जनतेच्या सुविधेसाठी उपलब्ध केली जाणार आहे.
HMPV आजाराची लक्षणे जर आढळली तर अशा रुग्णांना वेगळे करण्याची सुविधा सरकारने तयार केली आहे. या रुग्णांसाठी मास्क देखील तयार ठेवण्यात आले आहेत.
प्रयागराज रेल्वे विभागाने महाकुंभमेळ्यासाठी प्रत्येक रेल्वे स्टेशनवर भाविकांसाठी आरोग्य निरीक्षण कक्ष तयार करणार आहेत.
कुंभमेळाच्या परिसरात 13 हजारहून अधिक सब सेंट्रल रुग्णलायाची व्यवस्था केली जाणार आहे.
रुग्णालयात 24 तास डॉक्टरांच्या उपस्थितीचे आदेश दिले आहेत. ECJ मशीन, ऑक्सिजन यांसारख्या प्रथमोपचाराच्या सुविधा उपलब्ध असणार आहेत.
प्रत्येक निरीक्षण कक्षांसाठी नर्स स्टाफ, फार्मासिस्ट, हाऊस किपिंग असिस्टंट यांची 24 तास ड्युटीवर असणार आहे.
अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेद्वारे जवळच्या रुग्णालयात नेण्यासाठी जलमार्गाने पोहोचविण्याची सुविधा करण्यात आली आहे.