सरकारनामा ब्यूरो
लाखो विद्यार्थी 12 वीची परीक्षा पास केल्यानंतर IIT आणि IIIT साठी अॅडमिशन घेतात. तर जाणून घेऊयात, या दोन्हींमध्ये काय फरक आहे.
IIT आणि IIIT साठीच्या परीक्षा या National Testing Agency (NTI) संस्थेच्या माध्यमातून घेतल्या जातात.
IIT मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जेईई मेन आणि यानंतर जेईई अॅडवान्सड परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांच्या रँकनुसार जागा मिळतात.
IIIT बीटेकमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जेईई मेनची परीक्षा असते. ही परीक्षा प्रत्येक वर्षी दोन विभागात आयोजित केला जात
आयआयटीमध्ये इंजिनिअरिंग, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पदवी आणि पदव्युत्तरचा अभ्यास केला जातो.
देशात सध्या 23 IIT संस्था असून, ते देशभरातील विविध शहरांमध्ये आहेत.
IIIT चे देशात एकूण 26 संस्था असून त्यातील 21 सार्वजनिक आणि खासगी संस्थाद्वारे चालवली जातात,तर 5 सरकारी आहेत.