Rashmi Mane
आयटीआर फाइल करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. आता आयटीआर फाइल करण्यासाठीची मुदत वाढवून देण्यात आली आहे.
आयटीआर फाइल करण्याची तारीख 31 जुलै 2025 होती.ती पुढे 15 सप्टेंबर 2025 झाली होती.
आता आयटीआर फाइल करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2025 करण्यात आली आहे. हा निर्णय वित्त मंत्रालयाने दिले आहे.
आयटीआर पोर्टलवर सर्व्हर, टाइम आउट आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे ही तारीख वाढवली आहे.
आयटीआर फाइल करण्याची मुदत 1 दिवस म्हणजेच 16 सप्टेंबरपर्यंत वाढवून देण्यात आली आहे. तुम्ही आज रात्रीपर्यंत आयटीआर फाइल करु शकतात. आयकर विभागाने याबाबत प्रेस रिलीजमध्ये माहिती दिली आहे.
सैलरी आणि पेंशन मिळणारे लोक
हाऊस प्रॉपर्टीपासून उत्पन्न मिळवणारे लोक
लॉटरी, हॉर्स रेस, किंवा अनलिस्टेड इक्विटीमध्ये गुंतवणूक करणारे
कंपनीचे डायरेक्टर
कैपिटल गेनवर उत्पन्न मिळवणारे
तरीही वेळ न गमावता आज रात्री पर्यंत आयटीआर फाइल करा. नंतर लेटर पेनल्टी किंवा इतर अडचणी होऊ शकतात.