Rashmi Mane
आयटीआर रिफंड अडकला आहे? मग काय कराल, आताच करा हे काम.
आयकर विभागाने यंदा आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे हजारो करदात्यांनी आतापर्यंत आयटीआर फाइल केले आहेत.
आयटीआर फाइल केल्यानंतर साधारणपणे 20 दिवस ते 1 महिना एवढ्या वेळेत टॅक्स रिफंड येतो. पण काहींचे रिफंड अजून आलेले नाहीत.
टॅक्स रिफंडला उशीर होण्यामागे काय कारणं असू शकतात? आयकर विभागाने दिलेली महत्वाची माहिती जाणून घ्या.
रिफंडमध्ये विलंब होण्याची प्रमुख कारणं म्हणजे सिस्टीममधील स्वयंचलित पडताळणी, अतिरिक्त जोखीम मूल्यांकन तपासणी किंवा चुकीचे दावे पास होऊ नयेत यासाठी सुरक्षा यंत्रणा.
या तपासण्यांमुळे प्रोसेसिंगला जास्त वेळ लागू शकतो. पण आयकर विभागानुसार लवकरच प्रोसेसिंग जलद केले जाणार आहे.
त्यामुळे अजून अडकलेले रिफंड लवकरच मिळतील, अशी माहिती आयकर विभागाने दिली आहे.
अधिकृत वेबसाइटवर जा त्यानंतर यूजर आयडी-पासवर्डने लॉग इन करा. Income Tax Return ऑप्शनवर क्लिक करा. View Filed Return वर क्लिक करा आणि तुमचा स्टेटस दिसेल.