Roshan More
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या अचानक निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जगदीप धनखड यांचा जन्म १८ मे १९५१ रोजी राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील किठाना या छोट्या गावात झाला. शेतकरी पुत्र ते उपराष्ट्रपती असा त्यांचा प्रवास राहिला.
धनखड यांचे शालेय शिक्षण चित्तौडगड येथील सैनिक स्कूलमध्ये पूर्ण केले.
त्यांनी जयपूरमधील महाराजा कॉलेजमधून भौतिकशास्त्र विषयात बीएससी (ऑनर्स) पदवी मिळवली.
बीएससीनंतर त्यांनी राजस्थान विद्यापीठातून एलएलबी (LLB) पदवी मिळवली.
धनखड यांनी राजस्थान उच्च न्यायालयापासून आपल्या वकिलीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही प्रॅक्टीस केली. जनता दलातून त्यांनी आपल्य राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
३० जुलै २०१९ रोजी त्यांनी पश्चिम बंगालचे २१वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती. राज्यपालपदानंतर त्यांनी एनडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले.