Rashmi Mane
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तब्येतीच्या कारणामुळे राजीनामा दिला आहे.
त्यांच्या या निर्णयानंतर अनेकांना प्रश्न पडला की, उपराष्ट्रपतींना किती पगार मिळतो, राजीनाम्यानंतर किती पेन्शन मिळते आणि कोणत्या सुविधा दिल्या जातात?
भारताच्या उपराष्ट्रपतींना दरमहा सुमारे 4 लाख पगार दिला जातो. हा पगार राज्यसभेचे सभापती या नात्याने दिला जातो.
याशिवाय त्यांना विविध भत्तेदेखील मिळतात, जे वेगळे असतात. थोडक्यात सांगायचे तर, उपराष्ट्रपतींचा स्वतंत्र पगार नसतो, परंतु सभापती म्हणून त्यांना वेतन मिळते.
नियमांनुसार, राजीनामा दिल्यानंतरही उपराष्ट्रपतींना पेन्शन मिळत राहते. ही पेन्शन त्याच्या पगाराच्या सुमारे अर्धी म्हणजे 1.5 लाख ते 2 लाख दरम्यान असते.
राजीनामा दिल्यानंतरही माजी उपराष्ट्रपतींना केंद्र सरकारकडून अनेक सेवा-सुविधा मिळतात.
लुटियन्स झोनमध्ये आलिशान सरकारी निवासस्थान तसेच एक अधिकृत सरकारी गाडी आणि सुरक्षा व्यवस्था.
त्यासोबतच कामकाजासाठी विशेष कर्मचारी वर्ग (स्टाफ) वैद्यकीय खर्च आणि प्रवासाचा खर्च मिळतो.