वर्ष उलटून गेले, तरी सरकारी बंगला नाही; धनखड राहतात भाजपविरोधात असलेल्या मित्राच्या फार्महाऊसमध्ये...

Rajanand More

जगदीप धनखड

भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याला एक वर्षाहून अधिक काळ उलटून गेला आहे. त्यांनी २१ जुलै २०२५ रोजी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला होता.

Jagdeep dhankhar | Sarkarnama

निवासस्थान सोडले

राजीनाम्यानंतर धनखड यांनी काही दिवसांनी उपराष्ट्रपतीपदासाठीचे अधिकृत निवासस्थान सोडले. मात्र, हे निवासस्थान सोडत असताना त्यांना प्रोटोकॉलनुसार मिळणारे दुसरे निवासस्थान मिळाले नाही.

Jagdeep Dhankhar | sarkarnama

अजूनही प्रतिक्षा

धनखड यांना केंद्र सरकारकडून अद्याप कोणतेही सरकारी निवासस्थान देण्यात आलेले नाही. ते सध्या दिल्लीत एका खासगी फार्महाऊसमध्ये राहत असल्याचे सांगितले जाते.

Jagdeep Dhankhar | Sarkarnama

कुणाचे फार्महाऊस?

मिडिया रिपोर्टनुसार, धनखड हे सध्या दिल्लीतील छतरपूर परिसरातील इंडियन नॅशनल लोकदलाचे (INLD) नेते अभय सिंह चौटाला यांच्या खासगी फार्महाऊसमध्ये राहत आहेत.

Jagdeep Dhankhar | Sarkarnama

कोण आहेत चौटाला?

धनखड आणि चौटाला यांचे कौटुंबिक संबंध असल्याचे सांगितले जाते. धनखड हे मुळचे हरियाणाचे आहेत. तर चौटाला हे हरियाणातील मोठे राजकीय प्रस्थ आहे. धनखड पूर्वी भाजपमध्ये सक्रीय होते. दोन्ही पक्ष काही काळ सत्तेतही होते.

Jagdeep Dhankhar | Sarkarnama

काय आहे नियम?

माजी उपराष्ट्रपतींना नियमानुसार, साधारणपणे टाइप-८ श्रेणीतील सरकारी बंगला दिला जातो. त्यामध्ये सर्वप्रकारच्या सुविधा, सुरक्षाव्यवस्था असते. त्याचा संपूर्ण खर्च सरकार उचलते.

Jagdeep Dhankhar | sarkarnama

पर्यायी व्यवस्था

सरकारी बंगला किंवा निवासस्थान उपलब्ध नसल्यास सरकारकडून खासगी बंगला भाडेतत्वावर घेऊन तो उपलब्ध करून देण्याचीही तरतूद आहे. त्यासाठीही काही नियम, अटी आहेत.

Jagdeep Dhankhar | Sarkarnama

अर्जच नाही?

सरकारी बंगल्यासाठी गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाकडे अर्ज करणे अपेक्षित असल्याचे मिडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. मात्र, धनखड यांच्या कार्यालयाकडून तसा अर्जच नसल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केल्याचे मिडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Jagdeep Dhankhar | Sarkarnama

NEXT : वडिलांची 26 वर्षांपूर्वी हत्या, त्याचदिवशी 'हा' नेता देणार खासदारकीचा राजीनामा!

येथे क्लिक करा.