Deepak Kulkarni
प्रत्येकाला नोकरी करताना जास्तीत जास्त पगार मिळावा ही अपेक्षा असते. पगारावरच सगळंं गणित अवलंबून असतं.
एका भारतीय माणसाला जगातला सर्वाधिक पगार दिला जातो. त्याला मिळणारा पगार सुंदर पिचाईंसारख्या इतर प्रसिद्ध सीईओंपेक्षाही जास्त असल्याची माहिती आहे.
भारतीय सीईओ जगदीप सिंग हे जागतिक पातळीवर सर्वाधिक पगार घेणारे कर्मचारी म्हणून समोर आले आहेत.त्यांचा वार्षिक पगार ₹ 17,500 कोटी इतका आहे.
'सिंग इज किंग' असलेले जगदीप यांना तासाला 2 कोटी,दिवसाला 48 कोटी रुपये पगार मिळतो. हा आकडा अनेक मोठ्या कंपन्यांच्या वार्षिक उत्पन्नांपेक्षाही काहीएक पटीनं जास्त आहे.
इलेक्ट्रिक वाहन (EV) बॅटरी तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या क्वांटमस्केप या कंपनीचे माजी सीईओ आणि संस्थापक असलेले जगदीप सिंग सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे.
त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून बीटेक आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातून एमबीएची पदवी मिळवली आहे.
सिंग यांनी एचपी आणि सन मायक्रोसिस्टम्स यांसह अनेक नामवंत कंपन्यांमध्ये नोकरी करताना विविध जबाबदारी सांभाळल्या आहेत.
जगदीप सिंग यांच्या कल्पक, तितक्याच नाविन्यपूर्ण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सक्षम नेतृत्वामुळे क्वांटमस्केप या वेगानं वाढणाऱ्या कंपनीनं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगलं नाव कमावलं आहे. त्यांची ही प्रचंड कमाई त्यांच्या स्टॉक ऑप्शन्स आणि कंपनीच्या उत्तम कामगिरीवर आधारित होती.