Roshan More
आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह हे कथित आर्थिक घोटाळ्या प्रकरणी तुरुंगात आहेत.
संजय सिंह यांची राज्यसभेची मुदत २७ जानेवारी रोजी संपत आहे.
'आप'ने संजय सिंह यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा राज्यसभेच्या खासदारकीसाठी उमेदवारी दिली आहे.
दिल्ली विधानसभेतील 'आप'च्या आमदारांची संख्या पाहता संजय सिंह पुन्हा एकदा राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात. त्यामुळे त्यांचे खासदार होणे फिक्स आहे.
संजय सिंह हे तुरुंगात आहे. मात्र, 'आप'ने दिलेल्या उमेदवारीमुळे ते पुन्हा खासदार होणार आहेत.
संजय सिंह हे भाजप विरोधात आक्रमक भुमिका घेणारे नेते म्हणून 'आप'मध्ये प्रसिद्ध आहेत.
2018 मध्ये संजय सिंह हे दिल्लीतून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते.
संजय सिंह हे अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी आहेत. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनापासून ते केजरीवालांसोबत आहेत.
संजय सिंह यांच्या उमेदवारी अर्जावर त्यांना स्वाक्षरी करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.