Vijaykumar Dudhale
राजर्षी शाहू महाराज यांचे मूळ घराणे असलेल्या घाटणे घराण्यात शौमिका महाडिक यांचा जन्म 14 जानेवारी 1982 रोजी झाला. शाहू महाराजांचे नातू मृग्रेंद्रसिंह घाटगे यांच्या त्या कन्या आहेत.
शौमिका यांनी एसएनडीटी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. शौमिका यांचा विवाह कोल्हापुरातील ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक यांचे धाकटे चिरंजीव अमल महाडिक यांच्याशी 2008 मध्ये झाला.
अमल महाडिक यांच्या रुपाने 2014 मध्ये कोल्हापूर दक्षिणमध्ये प्रथमच भाजपचा झेंडा फडकला. अमल यांच्या विजयात शौमिका यांचा सिंहाचा वाटा होता.
जनतेच्या आग्रहामुळे शौमिका महाडिक यांनी प्रथमच कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि जिंकलीसुद्धा. त्यांनी 2017 ते 2020 या दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदी भूषविले. त्या तब्बल पावणेतीन वर्षे अध्यक्ष होत्या.
शौमिका यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेला राज्यातील पहिला, तर देशपातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
शौमिका महाडिक यांनी भाजपच्या महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदाचीही जबाबदारी संभाळली आहे.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत शौमिका महाडिक या महाडिक गटाकडून एकमेव निवडून आल्या आहेत. गोकुळमध्येही त्या सतेज पाटील गटाला सळो की पळो करून सोडतात.
महाडिक घराण्याचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख असणाऱ्या शौमिका महाडिक ह्या माजी मंत्री सतेज पाटील यांच्या राजकीय साम्रज्याला कायम आव्हान देत असतात.
'अण्णा' आंदोलनात सहभाग, आता राज्यसभेवर संधी; कोण आहेत स्वाती