जैन मुनींसाठी रस्त्यांवर आखलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद; पण ते अनवाणी का चालतात?

Jagdish Patil

वाद

मुंबईतील घाटकोपर त्यानंतर दादरमधील 'शिवतीर्थ' परिसरात जैन साधूंसाठी आखण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून वाद निर्माण झाला आहे.

White Stripes Controversy | Sarkarnama

मनसे

मनसेने याविरोधात आक्रमत पवित्रा घेतला असून हा प्रकार सांस्कृतिक दहशतवाद असल्याची टीका केली आहे.

mns ON White Stripes Controversy | Sarkarnama

जैन

तर जैन समाजाने त्यांच्या साधूंना अनवाणी चालताना पायाला चटके लागू नयेत म्हणून ही पट्टी आखल्याचं सांगितलं आहे.

Jain Monks Barefoot Tradition | Sarkarnama

दावा

शिवाय मागील 5 ते 6 वर्षांपासून अशी व्यवस्था केली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Jain Monks Barefoot Tradition | Sarkarnama

अनवाणी

याच पार्श्वभूमीवर जैन मुनी अनवाणी (पायात चपला किंवा बूट न घालता) का चालतात? ते जाणून घेऊया.

Jain Monks Barefoot Tradition | Sarkarnama

जीवनशैली

जैन धर्मात साधू आणि साध्वींचे पायी चालणे (विहार करणे) हा त्यांच्या कठोर आध्यात्मिक जीवनशैलीचा एक मुख्य भाग आहे.

Jain Monks Barefoot Tradition | Sarkarnama

अहिंसा

जैन धर्मात अहिंसेला खूप महत्व असल्यामुळे चालताना पायाखाली जमिनीवरील कीटक, मुंग्यासारख्या जीवांची हिंसा होऊ नये याची काळजी घेतली जाते.

Jain Monks Barefoot Tradition | Sarkarnama

महत्त्व

तसंच जैन धर्मात अहिंसा, त्याग आणि अपरिग्रह (कुठल्याही वस्तूचा संग्रह न करणे) यांना अत्यंत महत्त्व आहे.

Jain Monks Barefoot Tradition | Sarkarnama

प्रयत्न

त्यामुळे ते कोणत्याही प्रकारच्या भौतिक सुखसोयींपासून दूर राहण्याचा प्रयत्न साधू करतात.

Jain Monks Barefoot Tradition

त्याग

बूट-चप्पल वापरणे ही एक प्रकारची मालमत्ता किंवा सुविधा मानली जाते, त्यामुळे त्याचा त्याग करतात.

Jain Monks Barefoot Tradition

प्रवास

जैन परंपरांमध्ये पायी प्रवास करणे नियमबद्ध मानले जात असल्याने जैन मुनी अनवाणी पायाने प्रवास करतात.

Jain Monks Barefoot Tradition

NEXT : काँग्रेसचे आतापर्यंत किती तुकडे झाले? देशाच्या राजकारण 'हे' पक्ष अजूनही पाय रोवून उभे...

Congress | Sarkarnama
क्लिक करा