Ganesh Sonawane
मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यावरून सध्या मोठा वाद सुरु आहे. जैन धर्मीयायांकडून हे कबुतरखाने बंद करण्यास विरोध आहे.
जैन समाजामध्ये कबुतरांना पवित्र स्थान आहे. त्यामुळे जैन धर्मीय कबुतरांना दाणे खाऊ घालतात.
अनेक जैन मंदिर आणि धर्मशाळांजवळ कबुतरांना दाणे टाकण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी खास "पक्षी निवास" बांधले जातात.
जैन साधू-साध्वी कबुतरांप्रती विशेष प्रेम व जिव्हाळा दाखवतात. अनेक ट्रस्ट 'कबुतरखाना' संस्थाही चालवतात.
कबुतरांना अन्न-पाणी दिल्याने पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळते, पितृदोषापासून मुक्ती मिळते अशी धारणा जैन धर्मियांमध्ये आहे.
जीवदया" अंतर्गत जैन समाज पक्ष्यांसाठी दाणे-पाणी ठेवतो आणि "पंछीशाळा" म्हणजेच पक्षी दवाखाने चालवतो.
प्राचीन काळात कबुतरांद्वारे संदेश पाठवले जात, त्यामुळे त्यांना आदराचे स्थान मिळाले.
जैन समाज कबुतरांना दाणे टाकणे हे धार्मिक कर्तव्य मानतो, मात्र आरोग्यविषयक चिंता लक्षात घेऊन यावर बंदी घालण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला असून त्यामुळे वाद निर्माण झाला आहे.