Deepak Kulkarni
भारतीय इतिहासात आरस्पानी सौंदर्य लाभलेल्या महाराणी होऊन गेल्या. ज्यांची इतिहासाच्या पटलावर वर्षानुवर्षे नोंद घेतली जात आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे गायत्री देवी...
राजस्थानमधील जयपूरच्या हॉटेल रामबाग पॅलेसला तब्बल 190 वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभला अद्भुत सौंदर्यचा ठेवा म्हणून या वास्तूकडे पाहिले जाते. याच पॅलेसमध्ये गायत्री देवी यांनी वास्तव केलं होतं.
जयपूरचे महाराजा सवाई मानसिंग द्वितीय यांनी हा रामबाग पॅलेस महाराणी गायत्रीदेवी यांच्यासाठी बांधला. हा राजवाडा त्यांचं निवासस्थान होतं.
जयपूर घराण्याचं तब्बल 800 किलो सोने 15000 कोटींची मालमत्ता गायत्री देवींकडे होती.
महाराणी गायत्री देवी यांचा जन्म लंडन, युनायटेड किंगडममध्ये 23 मे 1919 रोजी झाला होता. नेहमीच त्यांनी महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या हक्कांचं समर्थन केलं. समाजसेवा आणि लोकांमध्ये प्रेम पसरविण्यासाठी कायमच त्या पुढाकार घेत.
विशेष बाब म्हणजे इंदिरा गांधी जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्री देवी यांनी लहानपणी एकाच शाळेत शिक्षण घेतलं होतं. गायत्री देवी इतक्या सुंदर आणि लोकप्रिय होत्या की, इंदिरा गांधींना त्यांचा हेवा वाटत असल्याचं बोललं जातं.
महाराणी गायत्री देवी यांना पोलो खेळ, घोडेस्वारी, गाडी चालवणं, पँट घालणं आवडत असत. तसेच अनेकदा त्या धूम्रपान करतानाही त्यांच्या फोटोंमध्ये दिसून येतात.
वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी गायत्री देवी या महाराजा सवाई मानसिंग यांच्या प्रेमात पडल्या होत्या. सहा वर्षाच्या प्रेमसंबंधांनंतर त्यांनी त्याकाळी साडे तीन लाख रुपये खर्च करत शाहीथाटात लग्न केलं होतं. तसेच 1967 आणि 1971 या दोन टर्म जयपूरच्या खासदार राहिल्या.
विशेष म्हणजे गायत्रीदेवी इतक्या सुंदर होत्या त्यांना कोणत्याही मेकअपची गरज नसत. लोकप्रिय व्होग मासिकाने जगातील सर्वात सुंदर 10 महिलांच्या यादीत त्यांचा समावेश केला होता.