सरकारनामा ब्यूरो
ऑक्टोबर २०२० मध्ये एकनाथ खडसेंनी भाजपला अधिकृतपणे सोडचिठ्ठी दिली आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्ष सोडताना त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले.
जळगाव जिल्हा दूध संघ, जिल्हा बँक आणि जळगाव महानगरपालिका निवडणुकीत दोघांनी एकमेकांना हरवण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली. आरोप-प्रत्यारोपांची पातळी वैयक्तिक झाली.
खडसेंनी अनेकदा महाजनांविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले, तर महाजनांनी खडसेंच्या चौकशी लावल्याचा आरोप झाला. खडसेंनी अनेकदा "माझ्याकडे सीडी आहे" असा इशारा देऊन राजकारण तापवले.
गेल्या काही काळात एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपमध्ये येण्याचे संकेत दिले, केंद्रीय नेतृत्वानेही हिरवा कंदील दिला होता. मात्र, स्थानिक पातळीवर गिरीश महाजन यांनी याला तीव्र विरोध दर्शवला, ज्यामुळे खडसेंची घरवापसी रेंगाळली.