सरकारनामा ब्यूरो
बुलडाण्याच्या जळगाव जामोदमध्ये भाजप नेते संजय कुटे यांचा जन्म झाला.
जळगाव जामोद मतदारसंघातून त्यांनी तब्बल चार वेळा आमदारकी मिळवली आहे.
जिल्ह्यातच प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर अमरावतीच्या मोझरी येथील आयुर्वेदिक महाविद्यालयातून त्यांनी बीएएमएसची पदवी प्राप्त केली.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच्या काही वर्षांनी त्यांनी थेट राज्याच्या विधिमंडळात प्रवेश केला.
2009 आणि 2014 मध्ये याच मतदारसंघातून ते विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते.
2019 मध्येही जळगाव जामोद येथून निवडणूक लढवली आणि त्यात ते बहुमतांनी विजयी झाले.
भाजपचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे कुटे यांना देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जाते.
त्यांच्यावर अनेकदा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्यामुळे कुटे यांना मंत्रिपदाचीही ऑफर मिळाली होती.
कुटे यांनी अनेक वेळा राजकीय पेच प्रसंग सोडवण्यात मोलाची भूमिका पार पाडली आहे.
R