Imtiaz Jalil News : छत्रपती संभाजीनगरमधून पुन्हा एकदा इम्तियाज जलील नशीब आजमावणार!

Deepak Kulkarni

दुसऱ्यांदा उमेदवारी...

इम्तियाज जलील हे दुसऱ्यांदा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहेत.

Imtiaz Jaleel | Sarkarnama

मुंबईमधून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा..

एमआयएमचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार तथा प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे या वेळी मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढवणार, अशा वावड्या मध्यंतरीच्या काळात उठवल्या गेल्या होत्या.

Imtiaz Jaleel | Sarkarnama

ओवैसी यांच्याकडून उमेदवारीची घोषणा

एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांच्याकडूनच आता जलील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

Imtiaz Jaleel | Sarkarnama

2019 ला अनपेक्षित विजय

2019 च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम-वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांचा या मतदारसंघातून अनपेक्षित विजय झाला होता.

Imtiaz Jaleel | Sarkarnama

...यामुळे विजय

दलित-मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांचा पाऊस आणि शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांच्या हक्काच्या हिंदू मतांमध्ये मोठ्या प्रमाणात पडलेली फूट इम्तियाज यांच्या पथ्यावर पडली होती.

Imtiaz Jaleel | Sarkarnama

वंचित - एमआयएम युती तुटली...

गेल्यावेळी सोबत असलेली वंचित आघाडी आता एमआयएमचा मित्रपक्ष राहिलेला नाही, त्यामुळे एमआयएमच्या अडचणी वाढल्या आहेत.

Imtiaz Jaleel | Sarkarnama

आक्रमक चेहरा...

जलील यांनी आपल्या पाच वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सत्ताधारी व इतर विरोधकांच्या विरोधात रान पेटवत लक्ष वेधले आहे. 

Imtiaz Jaleel | Sarkarnama

संसदेत सर्वाधिक प्रश्न

संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या खासदारांमध्ये इम्तियाज जलील यांचे नाव आहे.

Imtiaz Jaleel | Sarkarnama

जलील पुन्हा एकदा नशीब आजमावण्यास तयार...

महायुती-महाविकास आघाडीतील थेट लढत आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा तगडा अपक्ष उमेदवार उभा राहण्याची शक्यता गृहीत धरून जलील यांनी पुन्हा नशिब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. 

Imtiaz Jaleel | Sarkarnama

NEXT : इंडिया आघाडीने फुंकलं रणशिंग; देशभरातील नेत्यांनी दिल्या 'या' घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा...