मंत्री असून गुलाबरावांची जादू चालली नाही, जळगावची उमेदवारी मिळवणारे नंदू महाजन कोण?

Ganesh Sonawane

शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप विधानपरिषदेसाठी इच्छुक होते. पण जळगावची जागा भाजपला सुटली.

Sarkarnama

भाजपच्या नंदकिशोर महाजन यांना जळगाव विधानपरिषदेच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर झाली.

Nandu Mahajan | Sarkarnama

नंदकिशोर महाजन हे मंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात.

Nandu Mahajan | Sarkarnama

रावेर तालुक्यात भाजप संघटन उभारण्यात महाजन यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

Nandu Mahajan | Sarkarnama

भाजपच्या विविध आंदोलनांपासून निवडणूक व्यवस्थापनापर्यंत नंदू महाजन यांनी सातत्याने जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

Sarkarnama

जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण भागात मजबूत संपर्क जाळे निर्माण केले.

Nandu Mahajan | Sarkarnama

पक्षनिष्ठ कार्यकर्ता अशी त्यांची ओळख असून, संघटनात्मक स्तरावर कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा चांगला संवाद आहे.

Nandu Mahajan | Sarkarnama

भाजप पक्षासोबत निष्ठेने काम केल्याचे त्यांना बक्षीसी मिळाल्याचे मानले जात आहे.

Sarkarnama

केतकी पाटील, नंदू अडवाणी या भाजप नेत्यांच्या नावाची देखील चर्चा होती. त्यांनाही नंदू महाजन यांनी मागे टाकत बाजी मारली.

NEXT : दिग्गजांना चकवा देत उमेदवारी मिळणारे सुहास शिरसाट कोण?

येथे क्लिक करा