दोनदा बँक लुटली ; शंकर जासक असा झाला फौजदाराचा दरोडेखोर !

Ganesh Sonawane

फौजदारच बनला दरोडेखोर!

भोकर स्टेट बँकेवर पिस्तुलाच्या धाकावर दरोडा टाकणारा आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक (PSI) शंकर रमेश जासक असल्याचे उघड झाले आहे.

Jalgaon Bank Robbery, Shankar Jasak

लाच घेताना रंगेहाथ पकडले

रायगड जिल्हा पोलीस दलात कार्यरत असताना शंकर जासकला लाच घेताना अटक झाली होती. त्यानंतर त्याचे निलंबन झाले.

Jalgaon Bank Robbery, Shankar Jasak

पहिला दरोडा कालिंका माता शाखेत

१ जून २०२३ रोजी जळगावातील कालिंका माता मंदिराजवळील स्टेट बँकेवर जासकने दरोडा टाकला. यात ३ कोटी ६० लाखांचे सोने आणि १६ लाख ४० हजारांचा ऐवज लुटला.

Jalgaon Bank Robbery, Shankar Jasak

बँकेतील माहितीचा घेतला फायदा

जासकचा शालक याच बँकेत सफाई कर्मचारी होता. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दरोडा टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Jalgaon Bank Robbery, Shankar Jasak

कारागृहात झाली गजाननशी मैत्री

पहिल्या दरोड्याप्रकरणी जासक जळगाव जिल्हा कारागृहात होता. तेथे खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गजानन राजेंद्र पवार याच्याशी त्याची मैत्री झाली.

Jalgaon Bank Robbery, Shankar Jasak | Sarkarnama

कारागृहातच आखला दुसऱ्या दरोड्याचा कट

जासक आणि गजानन पवार यांनी कारागृहातच भोकर स्टेट बँक लुटण्याचा कट आखला. पवार जामिनावर बाहेर आल्यानंतर दोघांनी गावाची रेकी केली.

Jail | Sarkarnama

चादर विक्रेते बनून फिरले

दोघांनी चादर विक्रेते बनून गावात फिरत माहिती गोळा केली. गजानन पवार दरोड्याच्या दोन दिवस आधीही गावात येऊन गेला होता.

Jalgaon Bank Robbery, Shankar Jasak | Sarkarnama

पुन्हा दरोडा, चौघांना अटक

शनिवारी (ता. ३१) भोकर स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा टाकल्याप्रकरणी शंकर जासक, गजानन पवार आणि अन्य दोघांना अटक करण्यात आली.

Jalgaon Bank Robbery, Shankar Jasak | Sarkarnama

NEXT : स्वीकृत नगरसेवकाला असतात 'या' दोन मर्यादा, माहिती आहेत का?

History of Mahapaur Word
येथे क्लिक करा