Rajanand More
प्रत्येक घरातील ज्येष्ठ महिलेला दरवर्षी 18 हजार रुपये देणार. महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत.
सरकारी नोकरीत अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये पदोन्नतीत आरक्षण दिले जाईल.
काश्मीरमधील लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या समस्यांच्या निराकरणावर भर दिला जाणार. त्यासाठी स्वतंत्र धोरण तयार केले जाईल.
आयुष्यमान भारत योजनेतील पाच लाखांच्या कव्हरेजसह दोन लाख रुपये अतिरिक्त कव्हरेज देणार.
शहरी भागात मेट्रो सेवा सुरू करणार. तर ग्रामीण भागात तब्बल दहा हजार किलोमीटरच्या नवीन रस्त्यांची निर्मिती.
पीएम कृषी सन्मान निधीअंतर्गत शेतकऱ्यांना दहा हजार रुपये देणार. राज्याकडून अतिरिक्त चार हजार मिळणार.
जम्मूमध्ये आयटी हबची स्थापना करणार. तर उधमपूरमध्ये फार्मास्युटिकल पार्क आणि किश्तवाडमध्ये आयुष हर्बल पार्क उभारण्याची घोषणा.
कश्मिरी पंडितांसह पश्चिमी पाकिस्तानातील शरणार्थींसह इतरांचे पुनर्वसन करणार. काश्मिरी विस्थापितांप्रमाणेच जम्मूतील विस्थापितांनाही लाभ.
ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वाटप. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवास खर्चापोटी तीन हजार देणार.
दल सरोवरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणार. गुलमर्ग आणि पहलगामचा पर्यटन शहर म्हणून विकास करणार.