Rajanand More
नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या तिकीटावर जम्मू विभागातील नौशरा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. ते पहिल्यांदाच विधानसभेत पोहचले आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र रैना यांना चौधरींनी पराभवाची धूळ चारली. जवळपास आठ हजार मतांनी चौधरींचा विजय झाला.
रैना यांच्या पराभवानंतर ओमर अब्दुल्लांनी चौधरी यांना आपल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाचा मान दिला आहे. अब्दुल्ला यांच्यासह चौधरी व इतर चार मंत्र्यांचा बुधवारी शपथविधी पार पडला.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत सुरिंदर चौधरी यांचा नौशेरा मतदारसंघात पराभव झाला होता. रैनी यांनीच त्यांना पराभूत केले होते. चौधरी त्यावेळी पीपल्स डेमोक्रेटिक पक्षामध्ये होते.
जम्मू आणि काश्मीरमधील दिग्गज हिंदू नेत्यांपैकी सुरिंदर चौधरी हे एक आहेत. ते जाट समाजातील असून अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर चौधरी यांना विधान परिषदेत संधी देण्यात आली होती. ते माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षाचा हिंदू चेहरा म्हणून प्रसिध्द होते.
चौधरी यांनी 2022 मध्ये मुफ्तींची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. पण वर्षभरातच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली.
भाजपची साथ सोडल्यानंतर चौधरी यांनी विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी नॅशनल कॉन्फरन्समध्ये प्रवेश केला. तसेच नौशरामधून विधानसभेची तयारीही सुरू केली होती. त्यात त्यांना यशही मिळाले अन् थेट उपमुख्यमंत्री झाले.