Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद! 'एनआयए'च्या आरोपपत्रात काय काय?

Pradeep Pendhare

पहलगाम हल्ला

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानस्थित दहशतवादी हाफिज सईद याच्याविरुद्ध 'एनआयए'ने विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले.

Pahalgam Terror Attack | Sarkarnama

हाफिज सईदवर ठपका

या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदच होता, असा थेट ठपका ठेवत, तपास यंत्रणेने भारताबाहेरून देशाविरुद्ध युद्ध छेडल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे.

Pahalgam Terror Attack | Sarkarnama

पाकिस्तानातून कट

लष्कर-ए-तोयबा अन् 'द रेसिस्टन्स फ्रंट' या दहशतवादी संघटनांचा प्रमुख म्हणून हाफिज सईदने पाकिस्तानमध्ये बसून हल्ल्याचा कट रचल्याचा ठपका आहे.

Pahalgam Terror Attack | Sarkarnama

गंभीर गुन्ह्याची नोंद

भारतीय न्याय संहिता 2023 आणि बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा 1967च्या विविध गंभीर कलमांखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Pahalgam Terror Attack | Sarkarnama

हाफिजविरोधात पुरावे

हे नवे आरोपपत्र यापूर्वी दाखल केलेल्या 1597 पानांच्या मूळ आरोपपत्राचाच एक भाग असून, पाकिस्तानचे कारस्थान आणि हाफिज सईदविरुद्धचे वैज्ञानिक व तांत्रिक पुरावे सविस्तरपणे मांडले आहेत.

Pahalgam Terror Attack | Sarkarnama

26 जण ठार

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात नागरिकांना धर्म पाहून लक्ष्य करत, अमानुष गोळीबारात 25 पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकांना मारण्यात आले.Pahalgam Terror Attack

Pahalgam Terror Attack | Sarkarnama

पाकिस्तानाची कोंडी

पहलगाम दशतवाही हल्ल्यात आता थेट मुख्य म्होरक्या हाफिज सईदलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पाकिस्तानची कोंडी झाली आहे.

Pahalgam Terror Attack | Sarkarnama

तपास सुरूच

'एनआयए'ने तपास सुरू असून पाकिस्तानमधून चालवले जाणारे संपूर्ण दहशतवादी नेटवर्क आणि या कटातील प्रत्येक आरोपीला बेड्या ठोकण्यासाठी आणखी ठोस पुरावे गोळा केले जात असल्याचे सांगितले.

NEXT : खामेनेई यांची अत्यंयात्रेला जनसागर

येथे क्लिक करा :