Yathindra Siddaramaiah : थोरल्या भावाच्या मृत्यूनंतर राजकारणात, थेट आमदारकी; आता CM वडिलांची केली कोंडी

Rajanand More

यतिंद्र सिध्दरामय्या

यतिंद्र सिध्दरामय्या हे कर्नाटकाच्या राजकारणातील मोठे नाव आहे. सध्या ते विधान परिषदेचे आमदार आहेत.

Yathindra Siddaramaiah | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांचे पुत्र

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचे ते धाकटे पुत्र आहेत. थोरल्या भावाच्या अकाली निधनानंतर यतिंद्र यांचा राजकारणात प्रवेश झाला.

Yathindra Siddaramaiah | Sarkarnama

आमदारकी

यतिंद्र यांनी २०१८ मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली. वडिलांचा पारंपरिक मदारसंघ असलेल्या वरुणा मतदारसंघातून ते विजयी झाले.

Yathindra Siddaramaiah | Sarkarnama

विधान परिषदेवर

२०२३ ची विधानसभा निवडणूक यतिंद्र यांनी लढवली नाही. त्यानंतर २०२४ मध्ये काँग्रेसने त्यांना विधान परिषदेत पाठविले.

Yathindra Siddaramaiah | Sarkarnama

डॉक्टर

यतिंद्र हे पेशाने डॉक्टर आहेत. त्यांनी एमबीबीएस ही पदवी मिळवली होती. पण अचानक त्यांना राजकारणात यावे लागले.

Yathindra Siddaramaiah | Sarkarnama

प्रसिध्दीपासून दूर

यतिंद्र हे नेहमीच प्रसिध्दीपासून दूर राहिले. अत्यंत साधे राहणीमान आहे. वादग्रस्त विधाने करत नाहीत. राजकीय कुरघोड्यांपासूनही चार हात लांब असतात.

Yathindra Siddaramaiah | Sarkarnama

निवृत्तीवर भाष्य

वडिलांचे राजकीय करिअर अंतिम टप्प्यात असल्याचे विधान करत यतिंद्र यांनी खळबळ उडवून दिली. त्यामुळे ते अचानक प्रकाशझोतात आले आहेत.

Yathindra Siddaramaiah | Sarkarnama

राजकीय भूकंप

एवढेच नाही तर यतिंद्र यांनी थेट मंत्री सतीश जारकीहोळ यांच्या नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे करत वडिलांचीच कोंडी केली आहे.

Yathindra Siddaramaiah | Sarkarnama

NEXT : इच्छुकांनो, आधी हे वाचा! या कारणांमुळे बाद होतो उमेदवारी अर्ज...

येथे क्लिक करा.