Jagdish Patil
भारतासाठी, 'जन गण मन' हे राष्ट्रगीत आणि 'वंदे मातरम्' हे राष्ट्रीय गीत ओळख आणि अभिमानाची प्रतीके आहेत.
ही दोन्ही गीते देशभक्ती, एकता आणि राष्ट्रीय भावनेचा आविष्कार करतात.
या दोन्ही गीतांचा उद्देश एकाच राष्ट्राप्रती आदर आणि भक्ती व्यक्त करणे हाच आहे.
जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत असून ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं आहे.
27 डिसेंबर 1911 रोजी हे राष्ट्रगीत कोलकाता येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात प्रथमच गायलं गेलं.
राष्ट्रगीताचा वापर राष्ट्रीय सण, सरकारी कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्ये करणे अनिवार्य आहे.
तर वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत असून नुकतंच 7 नोव्हेंबर 2025 रोजी त्याला 150 वर्षे पूर्ण झाली.
वंदे मातरम् हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 7 नोव्हेंबर 1875 रोजी लिहिलं.
संविधानामध्ये 'वंदे मातरम्'ला राष्ट्रगीतासारखाच दर्जा आहे, परंतु ते सरकारी कार्यक्रमांमध्ये गाणे अनिवार्य नाही.