Jantar Mantar protest : जंतरमंतरवरील मन हेलावणारे 'हे' फोटो एकदाच पाहाच! ना लाठ्या, ना दगड...

Rajanand More

जंतरमंतर आंदोलन

दिल्लीतील जंतरमंतर याठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे. संसद मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलनाला पाठिंबा वाढत चालला आहे. त्यातीलच हे मन हेलावणारे फोटो.

Jantar Mantar Protest | Sarkarnama

एकमेकांची विचारपूस

आंदोलनादरम्यान विद्यार्थी, युवकांसह महिलाही सहभागी झाल्या आहेत. एका महिलेच्या पायाला झालेल्या दुखापतीबाबत विचारपूस करणार दुसरी महिला. महिलेच्या हातात सोनम वांगचूक यांचा फोटो आहे.

Jantar Mantar Protest | Sarkarnama

पायाला गंभीर दुखापत

फोटोतील तरूण आंदोलनातील स्वयंसेवक आहे. लाठीचार्जमध्ये त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याचे दिसते. इतर दोन सहकारी त्याला आधार देत आहेत.

Jantar Mantar Protest | Sarkarnama

ज्येष्ठांचाही पाठिंबा

आंदोलनाला सर्व वयोगटातून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. हातात काठी घेऊन चालणाऱ्या या आजोबांनीही जंतरमंतरवर उपस्थित राहत समर्थन दिले.

Jantar Mantar Protest | Sarkarnama

सामाजिक भान

आंदोलनस्थळी जमा झालेला कचरा स्वच्छ करण्याचे सामाजिक भानही आंदोलक दाखवत आहेत.

Jantar Mantar Protest | Sarkarnama

गोळ्याही खाऊ

लाठीचार्जनंतर तरुणाईच्या भावना अधिक तीव्र झाल्याचे दाखविणारा हा फोटो. लाठ्या खाल्या आता गोळ्याही खाऊ, पण केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊच, असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

Jantar Mantar Protest | Sarkarnama

मान-सन्मान

आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात महिलाही सहभागी झाल्या आहेत. सर्वजण खांद्याला खांदा लावून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

Jantar Mantar Protest | Sarkarnama

संताप

आंदोलकांकडून केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त करणारे फलकही आंदोलनस्थळी झळकावले जात आहेत.

Jantar Mantar Protest | Sarkarnama

NEXT : राहुल गांधींच्या 'या' फोटोंनी काँग्रेसला मिळाले नवे बळ

येथे क्लिक करा.