Jagdish Patil
आज देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आहे. तर दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर आज आपण बिहार आणि जवाहरलाल नेहरू यांच्यातील एक खास कनेक्शन जाणून घेणार आहोत.
नेहरूचा जन्म उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे झाला होता. मात्र त्यांच्या राजकीय कारकिर्दीला बिहारमधून एक नवी दिशा मिळाली.
पंडित नेहरूंचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. कारण ते लहान मुलांवर खूप प्रेम करायचे आणि मुलंही त्यांना 'चाचा' असं म्हणायचे.
तर याच नेहरूंचा पंतप्रधानापर्यंतचा प्रवास बिहारमधून कसा सुरू झाला याची हिस्ट्री खास आहे.
नेहरू 1912 मध्ये पहिल्यांदा बिहारमध्ये आले होते. यावेळी त्यांना त्यांचे पहिले सार्वजनिक व्यासपीठ मिळाले होते.
बिहारमधील पाटणा येथील बांकीपूर येथे त्यांनी पहिल्यांदा काँग्रेस बैठकीला हजेरी लावली होती.
या काळात काँग्रेसने आपले लक्ष खुल्या राजकारणाकडे केंद्रीत केल्यामुळे ते काँग्रेसमध्ये सहभागी झाले.
1912 मध्ये ते पाटण्यातील बांकीपूर येथे प्रतिनिधी म्हणून सामील झाले आणि तेथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला तो पंतप्रधानपदापर्यंत पोहोचला.