Jagdish Patil
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची आज पुण्यतिथी आहे. पंतप्रधान म्हणून त्यांची दिनचर्या कशी होती? त्यांचा आहार कसा होता याबाबतची माहिती जाणून घेऊया.
नेहरूंचे अनेक वर्ष सचिव असलेले एम ओ मथाई यांनी "रेमिनिसेन्सेस ऑफ द नेहरू एज" या पुस्तकात त्यांच्या आवडी निवडीबद्दल सर्व माहिती दिली आहे.
पुस्तकात मथाई सांगतात, नेहरू कष्टाळू होते. सचिवालयात सुट्टीच्या दिवशीही काम करण्यामुळे त्यांची रात्रीची झोप कमी व्हायची.
कारण ते रात्री केवळ 5 तास झोपायचे आणि रविवारीही काम करून झोप कमी झाल्यामुळे अनेकदा ते बैठकीतच झोपायचे. त्यामुळे मी त्यांना सुट्टी दिवशी झोप घेण्याची विनंती केली.
खूप समजावल्यानंतर नेहरूंनी रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी जेवणानंतर थोडी विश्रांती घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर ते दररोज जेवणानंतर अर्धा तास झोपू लागले, असं मथाई सांगतात.
रिपोर्टनुसार नेहरू पहाटे चारच्या सुमारास उठून योगा करायचे. त्यानंतर पंतप्रधान निवासस्थानाच्या बागेत थोडं फिरायचे.
दिवसा त्याची जेवणाची वेळ निश्चित होती पण रात्रीचे जेवण ते अनेकदा उशिराने करायचे. तर ते दिवसातून 16 तासांपेक्षा जास्त वेळ काम करण्यात आणि फायली पाहण्यात घालवत असे.
मथाईंनी पुस्तकात म्हटलं की, नेहरू जगातील सर्वोत्तम इंग्रजी गद्य लिहिणारे पंतप्रधान मानले जायचे कारण ते दररोज गद्याच्या दृष्टीने उत्कृष्ट असणारी 5 पत्रे लिहायचे.
तर नेहरूंना एअर कंडिशनर अजिबात आवडत नव्हता. तो उन्हाळ्यातही ऑफिसमध्ये किंवा घरी त्याचा वापर करत नव्हते, असंही मथाईंनी सांगितलं.
नेहरूंना कमी मसाल्यांचं जेवण आवडायचं, तर नाश्त्यात ते टोस्ट, बटर, अंडे आणि गरम कॉफी घेत. सुरक्षा अधिकारी रुस्तमजी सांगतात, नेहरू कधीही दारू पीत नव्हते, परंतु ते सिगारेट ओढायचे.