सरकारनामा ब्यूरो
मणिपूरच्या इम्फाळ जिल्ह्यात उपविभागीय दंडाधिकारी (SDM) म्हणून तैनात असलेल्या IAS अधिकारी पूजा एलंगबम या भारताच्या ईशान्य भागातील आहेत.
वडील आयपीएस अधिकारी असल्याने त्यांच्यापासून प्रेरित होऊन त्यांनीही आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. तयारीसाठी त्या दिल्लीला गेल्या.
डेहराडूनमधील वेल्हॅम गर्ल्स स्कूल, सेंट स्टिफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला गेल्या होत्या, पण डेंगीने त्रस्त होऊन पुन्हा घरी आल्या. तेथेच राहून तयारी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
घरीच अभ्यास केला आणि 2018 च्या यूपीएससी परीक्षेत त्यांनी 81व्या रँकसह परीक्षेत यश मिळवले.
मणिपूरमधील त्या तिसऱ्या महिला आयएएस अधिकारी आहेत.
लहानपणापासूनच त्यांना वाचनाची आवड आहे. मणिपूरच्या तरुणांमध्येही त्यांना वाचन, लेखन, साहित्य आणि कलेची आवड निर्माण करायची होती.
शिक्षणाला चालना देण्यासाठी 2019 मध्ये त्यांनी ‘बुक क्लब इम्फाळ’ लाँच केले. जेथे साहित्यापासून ते करिअरच्या पर्यायांपर्यंत विविध पैलूंवर चर्चा केली जाते.
या उपक्रमांतर्गत त्या दुर्गम जिल्ह्यातील तरुणांना भेटतात आणि त्यांच्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करतात.
R