Jagdish Patil
सपा खासदार जया बच्चन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. सध्या त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत.
या व्हिडिओत जया बच्चन कोणाशी तरी बोलत असताना त्याच्या जवळ एक तरुण येतो आणि सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतो. हे पाहून त्या रागावतात आणि त्याला ढकलून देतात.
त्यांच्या या कृतीवर भाजप खासदार कंगना रनौत यांनी टीका केली आहे. कंगनाने म्हटलं की, "बिघडलेली आणि विशेषाधिकारप्राप्त महिला.'
तसंच अमिताभ बच्चन यांची पत्नी आहे म्हणून लोक त्यांचा राग आणि नखरे सहन करतात, असा टोलाही कंगनाने लगावला आहे.
जया बच्चन यांनी आधीही अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. ज्यामुळे वाद झाला होता. ज्यामध्ये त्यांनी कुंभ मेळ्याबाबतही वादग्रस्त व्यक्त केलं होतं.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज महाकुंभ मेळाव्याबाबत बोलताना जया बच्चन म्हणाल्या की, कुंभमेळ्याचे पाणी सर्वात घाणेरडे आहे.
राज्यसभेत तालिका सभापतींनी त्यांचा 'जया अमिताभ बच्चन' असा उल्लेख केला. ज्यामुळे त्या भडकल्या आणि माझी स्वतंत्र ओळख असल्यामुळे नवऱ्याचं नाव घेऊ नका, असं त्यांना सांगितलं.
2008 मध्ये एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत आल्यावर त्यांनी आम्ही यूपीचे लोक असल्यामुळे आम्ही फक्त हिंदीतच बोलणार, असं म्हटलं. ज्यामुळे मराठी विरुद्ध हिंदी असा वाद निर्माण झाला होता.