Jagdish Patil
भारतातील महान शास्त्रज्ञांपैकी एक असलेल्या डॉ. विक्रम साराभाई यांची आज जयंती आहे. साराभाई यांनी भारताच्या अवकाश विज्ञानाचा पाया घातला आहे.
मिसाइल मॅन अब्दुल कलाम देखील साराभाईंचीच देन आहे. ते स्वतः म्हणायचे, मी उच्च शिक्षण घेतलं नाही पण मी खूप मेहनत करायचो आणि म्हणूनच साराभाईंनी संधी आणि मला पुढे जाऊ दिलं.
साराभाईंनी युकेमधील केंब्रिज विद्यापीठातून कॉस्मिक रे फिजिक्समध्ये ट्रायपोस (1939) आणि पीएचडी (1947) मिळवली. त्यांनी नोबेल पारितोषिक विजेते सर सी.व्ही. रमण यांच्यासोबतही काम केलंय.
28 वर्षांचे असताना त्यांनी मित्रांसह कुटुंबियांना एका संशोधन संस्थेसाठी पैसे देण्यासाठी राजी केलं. नोव्हेंबर 1947 मध्ये त्यांनी अहमदाबादमध्ये भौतिक संशोधन प्रयोगशाळा (PRL) स्थापन केली.
त्यांनी भौतिक संशोधन प्रयोगशाळा, अहमदाबाद (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कम्युनिटी सायन्स सेंटर, दर्पण अकादमी फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, विक्रम साराभाई स्पेस सेंटर).
तसंच तिरुवनंतपुरम स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटर, अहमदाबाद फास्टर ब्रीडर टेस्ट रिएक्टर अशा विविध संस्थांची स्थापना केली.
त्यांनी 1960 मध्ये अंतराळ संशोधनाची पायाभरणी केली. त्यांच्या याद्वारे त्यांनी टीव्ही, दूरसंचार, हवामान इत्यादी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम केले.
होमी भाभा यांच्या निधनानंतर, मे 1966 मध्ये त्यांनी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारलं आणि देशातील लोकांच्या समस्यां सोडवण्यासाठी तंत्रज्ञानावर काम केलं.
1962 मध्ये त्यांना इस्रोची जबाबदारी दिल्यानंतर वैयक्तिक संपत्तीचा विचार करत कामाचा मोबदला म्हणून केवळ एक रुपया या नाममात्र पगारावर त्यांनी काम केलं.