Jagdish Patil
पालघर विधानसभेची उमेदवारी डावलल्यामुळे श्रीनिवास वनगा दुखावले आणि त्याच नैराश्यातून ते बेपत्ता झाले होते.
उद्धव ठाकरेंची साथ सोडून आपण चुकलो, असं म्हणत CM शिंदेंवर जाहीर नाराजी व्यक्त करणारे श्रीनिवास वनगा कोण? ते जाणून घेऊया.
श्रीनिवास वनगा यांचे वडील चिंतामण वनगा हे पालघर जिल्ह्यातील भाजपचे दिग्गज आदीवासी नेते होते. त्यांनी भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे.
ते 2014 साली भाजपकडून पालघर लोकसभा लढवली आणि विजयी झाले. जानेवारी 2018 मध्ये त्यांच्या निधनानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली.
या पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेत घेण्यात एकनाथ शिंदेंची मोठी भूमिका निभावली होती.
या पोटनिवडणुकीत वनगा यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी कंबर कसली होती. मात्र तरीही ते पराभूत झाले.
2019 मध्ये युतीधर्मामुळे हा लोकसभा मतदारसंघ भाजपला गेला. त्यावेळी नाराज वनगा यांना ठाकरेंनी विधानसभेचं आश्वासन दिलं
त्यानुसार विधानसभेवर ते आमदार म्हणून निवडून गेले. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता.